विषारी लोकांना आयुष्यातून बाहेर हकला, आणि…, लग्नाच्या 10 महिन्यांनंतर परिणीतीची वादग्रस्त पोस्ट

विषारी लोकांना आयुष्यातून बाहेर हकला, आणि…, लग्नाच्या 10 महिन्यांनंतर परिणीतीची वादग्रस्त पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर करत, ज्यामुळे परिणीती हिला नक्की झालय तरी काय? असा प्रश्न चाहत्यांना पडत असते. आता देखील परिणीती हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट पाहिल्यानंतर अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्यात काही खटके तर उडाले नसतील ना? असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी परिणीती हिने आप पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केलं आहे.

लग्नाच्या 10 महिन्यांनंतर परिणीती चोप्रा हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये होडीत बसलेल्या परिणीतीच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे. अभिनेत्रीने नो-मेकअप लूकमध्ये मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री भावना व्यक्त करताना दिसत आहे.

परिणीती व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, ‘या महिन्यात मी काही काळ थांबून विचार केला… यातून मला एक गोष्ट विश्वासाने पुन्हा कळली ती म्हणजे मानसिकताच सर्वकाही आहे. महत्त्वहीन गोष्टींना (लोकांना) महत्त्व देणं बंद करा. आयुष्यातील एकही सेकंद वाया घालवू नका. आयुष्य टीक-टीक करणारं एक घड्याळ आहे. प्रत्येक वेळी स्वतःच्या भावनांना महत्त्व द्या… कृपया दुसऱ्यांसाठी जगणं सोडा…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा तुम्हाला इतरांच्या मताची भीती वाटते तेव्हा तुम्ही स्वतःचं जीवन जगणं थांबवता. आणि तुमच्या शेवटच्या दिवशी, यापेक्षा मोठा पश्चाताप कोणताच असणार नाही. स्वतःचा आनंद शोधा आणि विषारी लोकांना आयुष्यातून बाहेर हकला…

‘जग काय विचार करेल… प्रथम हा विचार करणं थांबवा.. स्वतःला आणि तुमच्या लोकांना आनंदी ठेवा. इतर गोष्टींप्रती असणारी तुमची प्रतिक्रिया आधी बदला… आयुष्यात आनंदी राहण्याची हिच एक चावी आहे. जीवन मर्यादित आहे… जे काही आहे ते आज आणि याक्षणी आहे… तुम्हाला जसं हवंय तसं जगा…’ असं देखील अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणाली.

परिणीतीची पोस्टपासून चाहते चिंतेत

लग्नाच्या 10 महिन्यांनंतर परिणीतीची अशी पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अनेकंनी अभिनेत्रीला अशी पोस्ट करण्यामागचं कारण विचारलं आहे. एक नेटकरी पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘ही पोस्ट कोणासाठी आहे?’, दुसरा नेटकरी म्हणाली, ‘प्रत्येकाला आयुष्यात संकटांचा सामना करावा लागतो.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अशा लोकांवर स्वतःचा वेळ वाया घायवायला नको…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘लग्नानंतर तू त्रस्त आहेस का?’ सध्या सर्वत्र परिणीतीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;