दीपिका पादुकोन आई झाल्यानंतर बाळासाठी घेणार मोठा निर्णय, कशी करणार सांभाळ?

दीपिका पादुकोन आई झाल्यानंतर बाळासाठी घेणार मोठा निर्णय, कशी करणार सांभाळ?

अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दीपिका पादुकोन सप्टेंबर महिन्यात तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या कोणत्याच सिनेमात अभिनेत्री काम न करण्याचा निर्णय अभिनेत्रीने घेतला आहे. प्रेग्नेंसीमुळे गेल्या काही दिवसांपासून दीपिका चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीने डिलिव्हरीनंतर मोठा निर्णय घेतला आहे. आई झाल्यानंतर दीपिका लवकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही अशी चर्चा रंगली नसल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्रीला तिच्या बाळासोबत अधिक वेळ व्यतीत करायचा असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

सांगायचं झालं तर, प्रेग्नेंसीमुळे दीपिका हिने इंटनॅशनल वेब सीरिज ‘द व्हाइट लोटस’ च्या तिसऱ्या सीझनला देखील नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाची काळजी घेण्यासाठी अभिनेत्रीने सीरिझला नकार दिला आहे. ज्यासाठी अभिनेत्री नवीन प्रोजेक्ट साईन देखील करत नसल्याची माहिती समोर येत आहे.

रिपोर्टनुसार, दीपिका कोणाच्या मदतीशिवाय बाळाचा सांभाळ करणार आहे. म्हणजे इतर सेलिब्रिटींप्रमाणे दीपिका बाळाचा सांभाळ करण्यासाठी नॅनी ठेवणार नसल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर, आई झाल्यानंतर दीपिका पती रणवीर सिंग याची देखील मदत घेणार नसल्याची माहिती समोर येत आहे. कारण अभिनेत्रीला स्वतः होणाऱ्या बाळासाठी सर्वकाही करायचं आहे.

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दीपिका लहान मुलांवर प्रचंड प्रेम करते. शिवाय लहान मुलांमध्ये अभिनेत्री लगेच मिसळून देखील जाते. त्यामुळे दीपिका तिच्या बाळाची एकटी काळजी घेऊ शकते… दीपिकाच्या बाळाला सांभाळण्यासाठी कोणती नॅनी नसणार आहे… दीपिका, रणबीर आणि त्याच्या आई – वडिलांची देखील मदत घेईल असं मला वाटत नाही… दीपिका 100 टक्के उत्तम आई होऊ शकते…’ असं देखील सांगण्यात येत आहे.

दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांनी मार्च महिन्यात प्रेग्नेंसी अधिकृत घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. एक खास पोस्ट शेअर करत दोघांनी आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. शिवाय अनेक ठिकाणी दीपिका बेबी बम्प देखील फ्लॉन्ट करताना दिसली.

एका जुन्या मुलाखतीत दीपिका हिने आई होण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मला तीन मुलांची आई व्हायचं आहे… अशी इच्छा अभिनेत्रीने व्यक्त केली होती. एवढंच नाही तर, दीपिका हिच्यासोबत लग्न झाल्यानंतर रणवीर याने एका मुलीचा बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका हिची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;