Multibagger stock : 7 रुपयांचा शेअर पोहोचला 1700 वर; 22 हजार टक्के परतावा, एका रिपोर्टने पुन्हा तेजी
जागतिक बाजारावर मंदीचे सावट आहे. याचा परिणाम शेअर बाजारावरही होत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी यात पडझड होताना दिसून येत आहे. गुरुवारीही निर्देशांक 109 अंकांच्या घसरणीसह 80,039 वर बंद झाला, तर निफ्टीमध्ये 7 अंकांची घसरण होऊन तो 24,406 वर पोहोचला. तर दुसरीकडे बँक निफ्टीमध्ये 428 अंकांची घसरण झाली आणि तो 50,888 वर बंद झाला. अर्थात बाजारात घसरण सुरू असली तरी लिकर कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र तेजी दिसून आली.
एका रिपोर्टमुळे लिकर कंपनीचे शेअर रॉकेट बनले आहेत. तिलकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड, यूनायडेट स्पिरीट लिमिटेड, यूनायटेड ब्रुअरीज लिमिटेड, रेडिको खेताना लिमिटेडचे शेअर 8 टक्क्यांहून अधिक वधारले. गुरुवारी तिलकनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये 8.48 टक्के वाढ होऊन तो 262 वर पोहोचला, यूनायडेट स्पिरीट लिमिटेडच्या शेअरमध्ये 4.62 टक्के वाढ झाली आणि तो 1449.50 रुपयांवर गेला. यासह यूनायटेड ब्रुअरीज लिमिटेड कंपनीचा शेअर 2.41 टक्के, तर रेडिको खेताना लिमिटेडचा शेअर 1.29 टक्के वाढला.
‘आज तक’ने इनफॉर्मिस्ट सोस्स बेसड रिपोर्टद्वारे दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री एन चंद्राबाबू नायडू हे अबकारी धोरणामध्ये बदल करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच नवीन धोरणा जाहीर केले जाईल. याद्वारे किंमत आणि गुणवत्ता मानकांमध्ये सुधारणा केली जाईल. यासह स्थानिक ब्रँडच्या लिकरसह बाहेरच्या ब्रँडची लिकरही मागवता येईल. हा रिपोर्ट येताच लिकर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी आली.
राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रिय डिस्टिलरीज आणि ब्रुअरीजसोबत बोलणी सुरू केली आहे. अबकारी धोरण लागू होताच पुरवठा सुरू होईल हा यामागील उद्देश आहे. तसेच मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडे हे उत्पादन शुल्क विभाग, लिकर खरेदी आणि किंमतीशी संबंधित मुद्द्यांवर विधानसभेत श्वेतपत्रिका सादर करणार आहेत, असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
7 ते 1700 रुपये
लिकर बनवणारी रेडिको खैतान या कंपनीच्या शेअरने गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत मालामाल केले आहे. जानेवारी 2003मध्ये या शेअरची किंतम 7.62 रुपये होती. मात्र सध्या हा शेअर 1742 रुपयांनी ट्रेड करत आहे. याचाच अर्थ या कंपनीने गुंतवणूकदारांना 22 हाजर 760 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कंपनीचा 52 विक हाय 1885.50 रुपये असून 52 विक लो 1141.25 रुपये आहे. दरम्यान, पाच वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 474 टक्के, तर वर्षभरात 25 टक्के परतावा दिला आहे.
(टीप – आम्ही कोणताही शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा सल्ला देत नाही. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच गुंतवणूक करा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List