बॉयफ्रेंड सलमान खानसोबत यूलियाची बर्थडे पार्टी, ‘त्या’ फोटोवर म्हणाली, ‘I Love You’

बॉयफ्रेंड सलमान खानसोबत यूलियाची बर्थडे पार्टी, ‘त्या’ फोटोवर म्हणाली, ‘I Love You’

अभिनेता सलमान खान याच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत सलमान याच्या नावाची चर्चा तुफान रंगली. आज दोन्ही अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे गेल्या आहेत. पण तरी देखील सलमान खान याच्यासोबत ऐश्वर्या, कतरिना यांच्या नावाची चर्चा सुरुच असते. पण आता सलमान खान गायक आणि मॉडेल यूलिया वंतूर हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. भाईजान याने कधीच यूलिया हिच्यासोबत असलेल्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. पण नुकताच, सलमान खान आणि खान कुटुंबाने यूलियाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.

यूलिया हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान, खान कुटुंब आणि मित्र परिवार एकाच छताखाली जमलं होतं. सध्या यूलिया हिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. असा एक फोटो ज्यावर यूलिया हिने ‘I Love You’ असं लिहिलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

सध्या ज्या फोटोची चर्चा रंगली आहे, तो फोटो खान कुटुंबाचा जावई अतुल अग्निहोत्री याने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यूलिया हिच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्वांचा फोटो अतुल अग्निहोत्री याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तोच फोटो री-पोस्ट करत यूलिया वंतूर हिने ‘I Love You’ आणि हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त यूलिया वंतूर हिच्या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे.

यूलिया वंतूर हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सलमान खान आनंदी दिसत होता. वाढदिवसासाठी खान कुटुंबासोबतच शेरा, गायक मिका सिंग, हिमेश रेशमिया, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल देखील उपस्थित होते. वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कशी झाली यूलिया वंतूर आणि सलमान खान यांची पहिली भेट?

सलमान खान आणि यूलिया वंतूरची पहिली भेट 2010 ला डब्लिनमध्ये झाली होती. त्यानंतर यूलिया एक्स-बॉयफ्रेंडसोबत भारतात आली. पण काही महिन्यांनंतर तिनं प्रियकराशी ब्रेकअप झालं आणि काही दिवस मुंबईत राहिल्यानंतर ती परत आपल्या देशात परतली. 2012 मध्ये सलमान खानच्या सांगण्यावरून ती पुन्हा त्याला भेटायला आली.

असं म्हणतात की सलमान खाननं त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये यूलिया हिच्या राहण्याची व्यवस्था केली होती. सिनेमात देखील यूलिया आणि सलमान यांनी एकत्र काम केलं. त्यानंतर यूलिया – सलमान यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील केलं जातं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;