पूजा खेडकर प्रकरणानंतर आली जाग; परीक्षा प्रक्रियेत यूपीएससी करणार मोठा बदल

पूजा खेडकर प्रकरणानंतर आली जाग; परीक्षा प्रक्रियेत यूपीएससी करणार मोठा बदल

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर या अनेक कारणांमुळे चर्चेत आल्या आणि यूपीएससीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणामुळे मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर अखेर यूपीएससी अर्थात भारतीय लोकसेवा आयोगाला खडबडून जाग आली असून परीक्षा प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रियेत डिजिटल बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

खेडकर या दिव्यांग प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्रामुळे चर्चेत आल्या. या पाश्र्वभूमीवर यूपीएससीने फसवणूक टाळण्यासाठी आणि तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. परीक्षेची विश्वासार्हता राखण्यासाठी यूपीएससीने बायोमेट्रिक प्रणालीच्या तंत्रज्ञानाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून निविदाही मागवल्या आहेत. याद्वारे परीक्षा प्रक्रियेची सुविधा अधिक मजबूत करण्यात येणार आहे.

असे असेल तंत्रज्ञान

  • आधार क्रमांकावर आधारित फिंगरप्रिंट प्रमाणीकरण किंवा डिजिटल फिंगरप्रिंट कॅप्चरिंग.
  • उमेदवारांसाठी चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान.
  • ई-अॅडमिट कार्डसाठी क्यूआर कोड स्कॅनिंग.
  • परीक्षेदरम्यान एआय आधारित सीसीटीव्ही सर्व्हेलन्स सिस्टीम.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;