अजित पवारांना क्लीन चिट देण्यास विरोध, शिखर बँक घोटाळय़ाप्रकरणी 50 निषेध याचिका दाखल होणार

अजित पवारांना क्लीन चिट देण्यास विरोध, शिखर बँक घोटाळय़ाप्रकरणी 50 निषेध याचिका दाखल होणार

शिखर बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोनदा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यास विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी तयारी दर्शवली. या प्रकरणात आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार आहेत. त्यावर 31 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयात गुरुवारी न्यायाधीश ए.यू. कदम यांच्यापुढे सुनावणी झाली. या वेळी माणिकराव जाधव यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील सतीश तळेकर आणि अॅड. माधवी अय्यापन यांनी न्यायालयात एक अर्ज सादर केला. आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सप्टेंबर 2020मध्ये अजित पवार यांना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानंतर यंदा मार्चमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला. या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत काही दिवसांपूर्वीच सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत. त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्यांतील सभासदांमार्फत आणखी 50 निषेध याचिका दाखल केल्या जाणार आहेत, अशी माहिती अॅड. तळेकर यांनी न्यायालयाला दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;