राष्ट्रपती भवनातील दोन हॉलची नावे बदलली, आता या नावांनी ओळखले जाणार

राष्ट्रपती भवनातील दोन हॉलची नावे बदलली, आता या नावांनी ओळखले जाणार

राष्ट्रपती भवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या हॉलपैकी दोन महत्त्वाच्या दोन हॉलची नावं बदलण्यात आली आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल हा यापुढे ‘गणतंत्र मंडप’ तर अशोक हॉल इथून पुढे ‘अशोक मंडप’ म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच यासंदर्भातली घोषणा केली आहे.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांसारखे मोठे कार्यक्रम पार पडतात. तर व अशोक हॉलमध्ये विशेष कार्यक्रम आय़ोजित केले जातात. गुरुवारी या दोन्ही हॉलची नावं बदलल्याची घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. राष्ट्रपती भवनाकडून याबाबत एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

“राष्ट्रपती भवनातील वातावरण हे भारतीय संस्कृती, मूल्ये आणि तत्वांचं प्रतिबिंब असावं, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत”, असं राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;