Maharashtra Rain Update : हेटवणे धरण ओव्हरफ्लो! नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला, धरणाचे 6 दरवाजे उघडले

Maharashtra Rain Update : हेटवणे धरण ओव्हरफ्लो! नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला, धरणाचे 6 दरवाजे उघडले

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे पेण तालुक्यातील हेटवणे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या धरणाची एकूण क्षमता 147 दशलक्ष घनमीटर आहे. मागील काही दिवसांपासून पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचे 6 दरवाजे उघडले आहे. दरवाजे केवळ सावधानता म्हणून उघडण्यात आल्याची माहिती हेटवणे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता धनश्री राजभोज यांनी दिली आहे.

हेटवणे धरण भरल्याने या धरणाचे 6 दरवाजे उघडले आहेत. त्यातून 1924.24 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. मागील आठवडाभर पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, अशी माहिती हेटवणे धरणाचे उपविभागीय अभियंता आकाश ठोंबरे यांनी दिली.

नदी व खाडी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

धरणातून विसर्ग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पेणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी खाडी व नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र खबरदारी घ्यावी, असे आवाहन नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;