श्वेता तिवारी हिने साडी घालून ओढली सिगारेट, अभिनेत्री म्हणाली, मी…

श्वेता तिवारी हिने साडी घालून ओढली सिगारेट, अभिनेत्री म्हणाली, मी…

अभिनेत्री श्वेता तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्वेता तिवारीने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे श्वेता कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. श्वेता तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत स्पष्ट म्हटले होते की, ती आता टीव्ही शोमध्ये काम करणार नाहीये. टीव्ही शोमध्ये काम केल्याने ती तिच्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. शूटिंग लोकेशनही दूर असल्याने आता पूर्वीप्रमाणे या गोष्टी करू शकत नाही.

टीव्ही शोनंतर श्वेता तिवारी हिने आपला मोर्चा हा आता वेब सीरिजकडे वळवला आहे. श्वेता तिवारी ही आता थेट साडीमध्ये सिगारेट ओढताना दिसणार आहे. श्वेता तिवारी ही म्हणाली की, मी धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी वेब सीरिजमध्ये काम करत आहे. त्यात मी डॉनसारखी व्यक्तिरेखा साकारत आहे.

या वेब सीरिजमध्ये मी साडी नेसून सिगारेट ओढत आहे. माझ्यासाठी हे पात्र खूप आव्हानात्मक होते.  म्हणूनच मला ते करायचं होतं, असेही श्वेता तिवारी हिने म्हटले आहे. श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे पलक तिवारी हिने थेट सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. 

पहिल्याच चित्रपटात म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश पलक तिवारी हिला मिळाले नाही. श्वेता तिवारी हिने मुलीच्या बॉलिवूड पर्दापणासाठी खूप परिश्रम घेतले. अनेक चित्रपट निर्मात्यांच्या भेटीही श्वेता तिवारी हिने घेतल्या. शेवटी श्वेता तिवारी हिच्या मदतीला सलमान खान हाच धावून आला आणि त्याने पलकला चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

श्वेता तिवारी ही फक्त तिच्या अभिनयासाठीच नाहीतर तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारी ही आपल्यापेक्षा तब्बल बारा वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याचे काही सांगितले जातंय. हेच नाहीतर यांचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले, ज्यानंतर ही चर्चा सुरू झाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;