शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात स्त्री जातीचे बेवारस अर्भक सापडले!

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात स्त्री जातीचे बेवारस अर्भक सापडले!

साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. प्रसुती वॉर्ड शेजारील कचराकुंडीत मंगळवारी रात्री स्त्री जातीचे बेवारस अर्भक आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सफाई कर्मचारी सफाईचे करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कॅरीबॅगमध्ये जड वस्तू दिसल्याने ते उघडून पाहिले असता त्यात स्त्री जातीचं अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेलं अर्भक मृत अवस्थेत आढळून आलं. या घटनेनंतर रुग्णालयासह परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रकरणाची चौकशी केली असता सदर अर्भक हे साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात जन्मलेलं नसल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत साईबाबा संस्थानच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासत आहेत.

नेमकं हे अर्भक कुणी आणून टाकलं? या बेवारस मृत अर्भकाचे माता-पिता कोण? याचा तपास करण्याचं आव्हान पोलिसांसह रुग्णालय प्रशासनासमोर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;