घरातील एकाकीपणा कमी करण्यासाठी मला बाळ…, रेखा यांचं मोठं वक्तव्य

घरातील एकाकीपणा कमी करण्यासाठी मला बाळ…, रेखा यांचं मोठं वक्तव्य

बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज रेखा बॉलिवूडपासून दूर असल्यातरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा रेखा यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल तर सर्वांना माहिती आहे. सांगायचं झालं तर, 1984 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत रेखा यांनी लग्न आणि कुटुंबावर मोठं वक्तव्य केलं होतं. शिवाय मुलाखतीत रेखा यांनी आई होण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.

रेखा म्हणाल्या होत्या, ‘मला खूप सारी लहान मुलं हवी आहेत. मला विश्वास आहे की आई होण्याची माझी इच्छा पूर्ण होईल. पण लग्नाआधी मला आई व्हायचं नाही. माझी आई मला कायम म्हणायची 30 व्या वयापर्यंत  मुलांना जन्म द्यायला हवा… मला देखील आई बोलायची त्यामध्ये तथ्य वाटायचं… मला असं वाटायचं माझ्या मुलांनी माझ्यासोबत मोठं व्हायला हवं. माझ्यात आणि मुलांमध्ये कोणते मतभेद नसायला हवेत असं मला वायायचं… कारण मी कायम 100 वर्ष पुढचा विचार करते..’

‘मी मझ्या घरात माझा स्वतःची प्रायव्हसीचा आनंद घेत असते. पण घरातील एकाकीपणा कमी करण्यासाठी मला माझं बाळ हवंय… घर मला मुलांनी भरलेलं हवं आहे. पण मला लग्नाआधी आई व्हायचं नाही. कारण मी माझ्या आईला पाहिलं आहे. वडीलांनी आम्हाला सांभाळलं नाही…’

‘एकट्या आईने आम्हाला वाढवलं आहे. त्यामुळे मी पाहिलं आहे एकट्याने मुलांना सांभाळ करणं सोपं नाही… मला नाही माहिती माझ्या बाळाचा जन्म कधी होईल… कदाचित होऊ देखील शकत नाही…’ असं देखील रेखा अनेक वर्षांपूर्वी म्हणाल्या होत्या आणि ते सत्य देखली झालं. रेखा आई होऊ शकल्या नाहीत.

रेखा यांचं वैवाहिक आयुष्य

अमिताभ बच्चन यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांनी स्वतःला संपवलं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांचा मृत्यू झाल्यामुळे रेखा यांना टीकेचा सामना करावा लागला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;