Yavatmal News : सर्पदंशाने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांची प्रकृती गंभीर

Yavatmal News : सर्पदंशाने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांची प्रकृती गंभीर

यवतमाळमध्ये रात्री गाढ झोपेत असताना बापलेकावर काळाने घाला घातला आहे. वणी येथे शास्त्रीनगरमध्ये रात्रीच्या वेळी झोपेत असताना बापलेकाला सर्पदंश झाल्याची घटना घडली आहे. यात एक वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दक्षित सुमित नेलावार असे मयत बालकाचे नाव आहे.

नेलावार दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह गाढ झोपेत असताना पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अंथरुणात विषारी साप शिरला. सापाने बापलेकाला दंश केला. सर्पदंशानंतर वेदना असह्य झाल्याने चिमुरडा रडू लागला. मुलाच्या रडण्याने सर्वांना जाग आली.

झोपेतून उठून पाहिले असता वडील सुमित व चिमुरड्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. दरम्यान त्याला तात्काळ वणीतील रुग्णालयात दाखल केले. तेथून दोघांनाही चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान चिमुरड्याचे दुःखद निधन झाले. तर वडील सुमित नेलावार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चिमुकल्याच्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;