Mumbai News : रोजच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीचा काटा काढला, महिलेला अटक

Mumbai News : रोजच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीचा काटा काढला, महिलेला अटक

रोजच्या मारहाणीला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना मुंबईतील भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर महिलेने थेट पश्चिम बंगाल गाठले. मात्र मुंबई पोलिसांनी कसून शोध घेत पश्चिम बंगालमधून महिलेला अटक केली आहे.

महिलेच्या पतीला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत तो दररोज पत्नीला मारहाण करत असे. घटनेच्या दिवशीही पतीने महिलेला मारहाण केली होती. अखेर रोजच्या मारहाणीला महिला कंटाळली आणि तिने पतीचा काटा काढण्याचे ठरवले.

भांडुपमधील कोकणनगर परिसरातील एका कन्स्ट्रक्शन साईटवर झोपला असताना महिलेने पतीचा गळा आवळला. यानंतर महिला तेथून फरार झाली आणि थेट पश्चिम बंगालमध्ये पोहचली. मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत महिलेचा शोध घेतला. यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी महिलेला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;