ऐश्वर्या रायसाठी मोठं गिफ्ट, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान बच्चन कुटुंबात ‘गुडन्यूज’

ऐश्वर्या रायसाठी मोठं गिफ्ट, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान बच्चन कुटुंबात ‘गुडन्यूज’

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला 16 वर्ष झाली आहेत. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या – अभिषेक किंवा दोघांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, अभिषेक याने ऐश्वर्या हिला मोठं गिफ्ट दिल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन याने स्वतःच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या कारचं स्वागत केलं आहे. बच्चन कुटुंबात आलेल्या नव्या कारचं थेट कनेक्शन ऐश्वर्या राय हिच्यासोबत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चन याने नवीर कार खरेदी केली आहे.

नव्या कारमधून अभिषेक बच्चन भाचा अगस्त्य नंदा, भाची नव्या नवेली नंदा आणि अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान हिला डिनर डेटसाठी घेवून गेला होता. तेव्हा अनेकांचं लक्ष अभिषेक बच्चन याच्या नव्या कारच्या नंबर प्लेटकडे गेलं. जो नंबर ऐश्वर्याच्या आवडीचा आहे. ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

अभिषेक बच्चन यांच्या नव्या कारचा नंबर 5050 आहे. जो ऐश्वर्याचा आवडता रंग आहे. सागंयाचं झालं तर, ऐश्वर्याची पांढऱ्या रंगाची ‘मर्सिडीज-बेंझ एस-क्लास’ जी आता विकली गेली आहे. त्या कारचा नंबर देखील 5050 होता. याशिवाय अभिषेकचा वाढदिवसही 5 फेब्रुवारीला असतो.

रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, जेव्हा ऐश्वर्या प्रेग्नेंट होती तेव्हा अभिनेत्रीला 5050 नंबर प्लेट असलेल्या कारमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्याच कारमधून ऐश्वर्या हिने आराध्या हिच्यासोबत घरात प्रवेश केला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांचं लग्न

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;