#PuneRains: जलमय पुणे; खडकवासल्यातून मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग, नागरिकांची सुरक्षित स्थळी धाव

#PuneRains: जलमय पुणे; खडकवासल्यातून मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग, नागरिकांची सुरक्षित स्थळी धाव

पुण्यातील खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज सकाळी हा विसर्ग वाढवण्यात आला.  27203 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात आला आहे. ज्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाला आहे. सिंहगड रोडवरील सोसायट्यांना याचा अधिक फटका बसल्याचं दिसत आहे. सिंहगड रोडवरील विठ्ठल नगर परिसरात पाणी शिरलं आहे. तर एकता नगरी भागातील द्वारका, जलपुजन, शारदा सरोवर, शाम सुंदर सोसायटीत पुराचे पाणी शिरले. पार्किंग परिसर पाण्यात गेल्यानं नागरिकांना त्यातूनच रस्ता काढावा लागत आहे. तर लोकांची सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

सामना न्युज एक्सप्रेस | Saamana News Express

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;