ऐश्वर्या राय हिने मान्य केली ‘ती’ गोष्ट, म्हणाली, अभिषेक बच्चन व माझ्यात मतभेद आणि वाद…

ऐश्वर्या राय हिने मान्य केली ‘ती’ गोष्ट, म्हणाली, अभिषेक बच्चन व माझ्यात मतभेद आणि वाद…

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी बॉलिवूडच्या टॉप जोडीपैंकी आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न केले. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी देखील आहे. लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. हेच नाहीतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला गेल्याचेही सांगितले जातंय.

कोणताही पुरस्कार सोहळा असू किंवा मुलगी आराध्या हिच्या शाळेतील फंक्शन याला ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कधीच एकत्र पोहोचताना दिसत नाहीयेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यातही बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्या राय ही पोहोचली नाही. यामुळेच घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच उधाण आल्याचे बघायला मिळाले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता ऐश्वर्या राय हिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही अत्यंत मोठे खुलासे आपल्या आणि अभिषेक बच्चनबद्दल करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही तिच्यामधील आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मतभेदावर स्पष्ट बोलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Celebs Real Talk (@dystopiacape)

ऐश्वर्या राय म्हणाली की, माझ्याlतील आणि अभिषेकमधील मतभेद तशी आमची वैयक्तिक बाब आहे. आम्ही दोघे खूप मजबूत विचारशील व्यक्तिमत्त्व आहोत आणि आम्ही अजूनही वाद घालणे आणि चर्चा करणे यातील फरक शिकत आहोत. आमच्यात खूप मजबूत जीन्स आहेत. त्यामुळे आम्ही नैसर्गिकरित्या मजबूत व्यक्तिमत्त्व आहोत. वादविवाद आणि चर्चा यात एक अतिशय बारीक रेषा आहे आणि ती नेमकी काय आहे हे अजूनही शोधत आहोत.

आम्ही खूप चर्चा करतो. कधी नम्रपणे तर कधी वाद घालून  पण…आता ऐश्वर्या राय हिची हीच मुलाखत चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, काही विषयावरून तिच्यामध्ये आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद देखील होतात. ऐश्वर्या राय हिने बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;