‘लाखात एक आमचा दादा’ निर्णायक वळणावर; तुळजाचा ‘तो’ निर्णय मालिकेला देणार नवं वळण

‘लाखात एक आमचा दादा’ निर्णायक वळणावर; तुळजाचा ‘तो’ निर्णय मालिकेला देणार नवं वळण

‘लाखात एक आमचा दादा’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि कथानक हे या मालिकेचं वेगळेपण ठरलं आहे. सध्या मालिकेत एक नाही तर दोन लग्नांची लगबग सुरु आहे. दादाच्या घरी मोठी बहीण तेजू हिचा साखरपुडा ठरला आहे. साखरपुड्यासाठी घरात जोरदार तयारी सुरु आहे सगळे उत्साहात आहेत. त्यामुळे सूर्या दादाचा आनंद गगनात मावत नाहीये. पण अशातच आता ही मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. तुळजाचा एक निर्णय मालिकेला नवं वळण देणारा ठरणार आहे.

नव्या प्रोमोत काय?

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात तुळजा सूर्याला सांगते की तू माझं लग्न मोड आणि त्यानुसार सूर्या एक प्लॅन तयार करतो. सूर्या पायरीवर दूध टाकतो त्यामुळे सत्यजित पडतो आणि त्याची मान मोडते. यामुळे घरात एकच गोंधळ होतो. आता तुळजाच्या या निर्णयामुळे मालिका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

सूर्याच्या बहिणीच्या लग्नाची तयारी पाहून जालिंदरला स्वतःच्या मनाशी गाठ बांधतो की तेजश्रीच्या लग्नाआधी आपल्या घरात तुळजाचं लग्न धूमधडाक्यात व्हायला हवं. तुळजाचा भाऊ शत्रुघ्न लोकांना गुंतवून ठेवतो आणि तेजूच्या लग्नात विघ्न आण्यासाठी गोंधळ घालतो. ज्यामुळे सूर्या दादाची आई पळून गेली आहे. यावर चर्चा रंगते आणि तेजूचं लग्न मोडतं.

तुळजा सूर्याला सांगणार मनातली गोष्ट

सूर्यादादाच्या घरात जेव्हा हे कळतं तेव्हा संपूर्ण घर उध्वस्त होतं. जालिंदरच्या कानावर ही बातमी पोहचते. दादाने सर्वांना या दु:खातून बाहेर काढायचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे गावात जत्रा आयोजित केली गेली आहे. त्या जत्रेत तुळजा सूर्याला सांगते की तिला सत्यजितशी लग्न करायचं नाहीये आणि म्हणूनच ती ज्या जत्रेला जात आहे. तिथे तिला सूर्याची सोबत हवी आहे. हे ऐकून सूर्याने तुळजाला जत्रेला घेऊन जायचे ठरवलं आहे. तुळजा तिच्या मनातलं सूर्यासमोर सांगू शकेल? यामुळे सूर्याच्या स्वप्नाला नवीन पंख मिळतील? सत्यजितशी लग्न न करायचा निर्णयामुळे काय असेल जालिंदरचा पुढचा डाव? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा पुढचा भाग पाहावा लागणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;