तिसरा संसार थाटल्यानंतरही संजूबाबाच्या खांद्यावर दुसऱ्या बायकोची जबाबदारी? पोटगीमध्ये दिल्यात महागड्या वस्तू…

तिसरा संसार थाटल्यानंतरही संजूबाबाच्या खांद्यावर दुसऱ्या बायकोची जबाबदारी? पोटगीमध्ये दिल्यात महागड्या वस्तू…

अभिनेता संजय दत्त याची तिसरी पत्नी मान्यता दत्त हिचा नुकताच वाढदिवस झाला. संजूबाबाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मान्यता ही संजूबाबाची तिसरी पत्नी आहे. अभिनेत्याच्या पहिल्या दोन पत्नींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. संजूबाबाच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा असं होतं. रिचा शर्मा हिचे मुलीच्या जन्मानंतर कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात दुसरी पत्नी रिया पिल्लाई हिची एन्ट्री झाली. अभिनेता तुरुंगात असताना रिया हिने संजूबाबाची साथ सोडली नाही. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त आणि रिया पिल्लाई यांनी लग्न केलं.

रिया पिल्लाई आणि संजय दत्त यांनी 14 फेब्रुवारी 1998 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. रिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, रिया हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं.

रिपोर्टनुसार, तुरुंगतू बाहेर आल्यानंतर रिया आणि संजय यांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. तुरुंगात असताना संजूबाबाने रिया हिला दिलेला शब्द पूर्ण तर केला. पण लग्नानंतर अभिनेता दुसऱ्या पत्नीला वेळ देऊ शकला नाही. संजूबाबा याने जवळपास सात सिनेमे साईन केले होते.

सिनेमांचं शुटिंग असल्यामुळे अभिनेता प्रोफेशनल आयुष्यात पूर्ण व्यस्त झाला. तर, लग्नानंतर देखील रिया एकटीच पडली. अशात घटस्फोट होण्याच्या आधी रिया हिच्या आयुष्यात टेनिसपटू लिएंडर पेस याची एन्ट्री झाली. रिया आणि लिएंडर यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.

अशात संजूबाबाने रिया हिला घटस्फोट दिला. यावेळी संजूबाबाने दुसऱ्या पत्नीला अनेक महागड्या वस्तू आणि आजही संजूबाबा दुसऱ्या पत्नीच्या इतर खर्चांची जबाबदारी सांभाळतो.. असं देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, यासिर उस्मानने त्यांच्या ‘द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड बॅड बॉय संजय दत्त’ पुस्तकातही या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे.

पुस्तकात लिहिलं आहे की, ‘बॉलीवूडमधील प्रत्येकाला वाटत होते की संजय दत्तची फसवणूक झाली आहे, परंतु संजय दत्तने घटस्फोटाच्या बदल्यात रिया पिल्लईला वांद्रे येथे दोन फ्लॅट्सही दिले शिवाय, देजा वु एंटरटेनमेंट आणि ग्लोबल एंटरटेनमेंट या दोन कंपन्यांचे शेअर्सही रियाच्या नावावर होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;