अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाबद्दल हैराण करणारा खुलासा, थेट म्हणाले, माझे कुटुंब बर्बाद..

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाबद्दल हैराण करणारा खुलासा, थेट म्हणाले, माझे कुटुंब बर्बाद..

अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक चढउतार देखील बघितले. एक काळ अमिताभ बच्चन यांच्या करिअरमध्ये असा होता, ज्यावेळी एकही अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करण्यास तयार नव्हती. अमिताभ बच्चन यांनी ठरवले होते की, ही शेवटची संधी असून जर हा चित्रपट हीट ठरला नाही आणि फ्लॉप गेला तर मुंबई सोडून आपल्या गावी परत जायचे. मात्र, तो चित्रपट हीट ठरला आणि अमिताभ बच्चन यांनी त्यानंतर आपल्या आयुष्यात मागे वळून बघितले नाही.

अमिताभ बच्चन आणि जया यांचे लग्न 3 जून 1973 मध्ये झाले. मात्र, अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न झाले. बिग बी यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या लग्नाबद्दल त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये मोठा खुलासा केला आहे. अमिताभ बच्चन आणि जया यांचे लग्न त्यांच्या मित्राच्या घरी झाले.

वऱ्हाडी म्हणून फक्त पाच लोक या लग्नात होते. हरिवंश राय बच्चन यांच्या म्हणण्यानुसार जया बच्चन यांचे कुटुंबिय या लग्नात अजिबात आनंदी नव्हते. जया बच्चन यांच्या घरच्यांची इच्छा होती की, हे लग्न बंगाली पद्धतीने व्हायला पाहिजे, ज्यावर कोणालाही आपत्ती नव्हती. पहिल्यांदा एक पूजा होती, ज्यामध्ये जयाच्या वडिलांना अमिताभ यांच्या घरी येऊन काही गिफ्ट द्यायचे होते.

लग्नामध्ये फक्त जया बच्चन या सोडल्यातर इतरही कोणीही आनंदी नसल्याचे हरिवंश बच्चन यांनी म्हटले. अमिताभ बच्चन यांची हळद देखील अत्यंत शांत वातावरणात झाली. हे लग्न होत असल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांना देखील माहिती नव्हते. वरातीचे स्वागत करण्यात नाही आले. लग्न होताच पाच वऱ्हाडी मंडळी जेवण करून त्यांच्या घरी परतले.

हरिवंश राय बच्चन यांनी म्हटले की, जाण्याच्या अगोदर मी अमिताभ बच्चन यांच्यासारखा जावई मिळाल्यामुळे जया यांच्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो असता त्यांनी मला म्हटले की, माझे सर्व कुटुंब पूर्णपणे बर्बाद झाले आहे. म्हणजेच काय तर जया बच्चन यांचे कुटुंबिय या लग्नामुळे अजिबातच आनंदी नसल्याचे बघायला मिळतंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;