रिकव्हर होत आहे…, लग्नाच्या 1 महिन्यानंतर सोनाक्षीची लक्षवेधी पोस्ट, कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती?

रिकव्हर होत आहे…, लग्नाच्या 1 महिन्यानंतर सोनाक्षीची लक्षवेधी पोस्ट, कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती?

अभिनेता झहीर इक्बाल आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. गेल्या महिन्यात 23 जून रोजी दोघांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट केले. दरम्यान, सोशल मीडियावर झहीर – सोनाक्षी यांच्या लग्नात उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. पण लग्नाच्या 1 महिन्यानंतर सोनाक्षी आणि झहीर यांनी पोस्ट केलेल्या फोटोंची अधिक चर्चा रंगली आहे. शिवाय फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे…

फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नात प्रचंड धावरळ झाली. त्यामुळे मी आता रिकव्हर होत आहेत.’ पुन्हा उत्साह निर्माण करण्यासाठी अभिनेत्री डिटॉक्स ट्रीटमेंटची मदत घेतली आहे. सोनाक्षीने 10 फोटो पोस्ट केले आहेत. फोटोत अभिनेत्री नवऱ्यासोबत खास क्षण व्यतीत करताना देखील दिसत आहे. लग्नानंतर फिलिपिन्स येथील एका निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या फार्ममध्ये गेले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाला, ‘आम्ही आमच्या लग्नाच्या एका महिन्याचा आनंद अशा ठिकाणी साजरा केला. ज्याची आम्हाला गरज होती. रिकव्हर होत आहे… ही कोणती जाहिरात नाही किंवा कोणी आम्हाला पोस्ट करण्यासाठी सांगितलं नाही. पण फिलीपिन्समधील फार्मबद्दलच्या आश्चर्यकारक गोष्टी शेअर करण्यास मी स्वतःला थांबवू शकत नाही..’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

‘एका आठवड्यात त्यांनी आम्हाला शिकवलं आरोग्य म्हणजे काय… स्वतःच्या शरीराचं ऐका आणि मनाची काळजी घ्या… निसर्गाच्या सानिध्यात राहाणे, योग्य वेळी जेवण… वेळेवर आरम करणे… डिटॉक्स उपचार आणि मसाज… प्रचंड उत्साह आणि आनंद वाटत आहे…’

पोस्टमध्ये पुढे सोनाक्षी हिने सर्वांचे आभार देखील मानले आहेत. ‘आमच्या सर्वत्र मित्रांचे आभार… ज्यांनी आम्हाला हा जीवन बदलणारा अनुभव असल्याची खात्री करून दिली…’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील सोनाक्षी – झहीर यांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;