मध्य रेल्वेचा 6 दिवसांचा ‘मेगा’ब्लॉक; पुणे विभागातील 19 गाड्या रद्द, 22 एक्स्प्रेसचे मार्ग बदलणार

मध्य रेल्वेचा 6 दिवसांचा ‘मेगा’ब्लॉक; पुणे विभागातील 19 गाड्या रद्द, 22 एक्स्प्रेसचे मार्ग बदलणार

मुसळधार पावसामुळे गेला आठवडाभर मध्य रेल्वे बेजार झाली आहे. आधीच मध्य रेल्वेवरील वाहतुकीचा बोजवारा उडाला असतानाच आता प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे. मध्य रेल्वेवर सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे विभागातील लांब पल्ल्याच्या गाड्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

कधी घेणार मेगाब्लॉक?

पुणे विभागात हा सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत. दौंड स्थानकावरील विविध कामासाठी 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान 19 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर 22 गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.

या गाड्यांचे मार्ग बदलणार

1. लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्स्प्रेस : 29 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान पुर्ण-मिरज-कुर्डुवाडी मार्गे रवाना होणार
2. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बंगळुरू एक्स्प्रेस : पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे रवाना होणार
3 बंगळुरु ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस : 27 ते 31 जुलैपर्यंत कुडुवाडी-मिरज-पुणे मार्गे जाणार
4. नागरकोयल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस : 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे रवाना होणार
5. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागरकोयल एक्स्प्रेस : 29 जुलै रोजी पुणे-मिरज-हुबळी-बल्लारी-गुंतकल मार्गे धावेल
6. चेन्नई – एकतानगर एक्स्प्रेस : 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे धावणार
7. सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;