Nagar: मनसेला धक्कादेत पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश
नगर तालुक्यातील जेऊर गटातील आगडगाव, ससेवाडी, शेंडी येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मनसे कार्यकारी सदस्य महाराष्ट्र राज्य तथा कामगार सेनेचे संकेत जरे यांचा देखील यात समावेश आहे.
यावेळी प्रसाद ससे, सचीन जरे, शुभम जरे, कृष्णा ससे, मयुर पवार, अजय जरे, प्रशात जरे, राहुल बोरुडे नवनाथ पागीरे, रुषीकेश पडोळे बजरंग खाडे यांनी प्रवेश केला .
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान सभासद नाव नोंदणी अभियानास सुरू करण्याचे अवाहन केले. याच अनुशंगाने आज जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांच्या उपस्थित आगडगाव, ससेवाडी, शेंडी येथील तरुणानी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, युवासेनाप्रमुख प्रविण गोरे, पोपट निमसे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, रामेश्वर सोलट, अरुण ससे, बाबासाहेब ससे, गिरिष जाधव, श्रीकांत पठारे, बाळासाहेब दुतारे, संतोष खेतमाळीस, विजय शेंडे उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List