Nepal Plane Crash : नेपाळमध्ये मोठी विमान दुर्घटना, टेक ऑफ करताना प्रवासी विमान कोसळलं
नेपाळमध्ये मोठी विमान दुर्घटना झाली आहे. राजधानी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेक ऑफ करताना विमान कोसळले आणि विमानाला आग लागली. ही दुर्घटना घडली तेव्हा विमानात पायलटसह 19 लोकं होते. हे विमान काठमांडूहून पोखरे येथे चालले होते.
प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान सूर्या एअरलाईन्सचे होते. टेक ऑफ दरम्यान धावपट्टीवरून घसरले आणि विमानाला आग लागली. याची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
अग्निशमन दलाकडून विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या विमान दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात विमान आगीच्या ज्वाळांनी घेरल्याचे दिसते. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असून त्यानंतरच विमानातील प्रवाशांची स्थिती स्पष्ट होईल.
#WATCH | Plane crashes at the Tribhuvan International Airport in Nepal’s Kathmandu
Details awaited pic.twitter.com/DNXHSvZxCz
— ANI (@ANI) July 24, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List