इम्रानखान यांचे पक्ष कार्यालय सील; पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक

इम्रानखान यांचे पक्ष कार्यालय सील; पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या कार्यालयावर सुरक्षा दलांनी छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी कार्यालय सील केले. तसेच पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यात पीटीआयचे माहिती सचिव रऊफ हसन यांचाही समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष गौहर खान यांनी सुरक्षा दलांवर गेल्या दोन महिन्यांत पक्षाच्या 10 मोठ्या नेत्यांचे अपहरण केल्याचा आरोप केला होता. याशिवाय पोलिसांनी महिला कर्मचार्‍यांना बळजबरीने वाहनात बसवले. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा तुरुंगात डांबलेल्या इम्रान यांनी आठवडाभरापूर्वी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विरोधात आपला पक्ष देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने करणार असल्याचे सांगितले होते.

 यापूर्वी इम्रान खान यांना 3 प्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतर यूएनने म्हटले होते की, इम्रान खान यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात ठेवण्यात आले आहे. सरकारला इम्रान यांचा पक्ष उद्ध्वस्त करायचा आहे असे दिसते. शाहबाज सरकारनेही आठवडाभरापूर्वी पीटीआयवर बंदी घालणार असल्याचे सांगितले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;