चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे भर चौकात युवकाची गोळ्या घालून हत्या; परिसरात दहशत
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे गजबजलेल्या चौकात एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शिवज्योतसिंग देओल (वय 28) असे मृताचे नाव आहे. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी मृतकाच्या लहान भावाने याच राजुरा शहरात गोळीबार केला होता. त्यात एका निष्पाप महिलेचा बळी गेला होता. आजच्याच दिवशी त्याच्या मोठ्या भावाला भरचौकात गोळ्या घालण्यात आल्या.
शिवज्योतसिंग वडिलांना भेटून कर्नल चौकातून जात असताना दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून मारेकरी त्याचा पाठलाग करत होते. दुचाकीवरील व्यक्ती आपल्याला मारणार, याची चाहूल लागताच शिवज्योतसिंग एका दुकानात घुसला. मारेकऱ्यांनी दुकानात घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे राजुरा शहरात खळबळ उडाली. घटना लोकांच्या समोरच घडल्याने चौकात मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी धाव घेत गर्दीला पांगवली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकालाही बोलावण्यात आले होते..
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List