भोकर-म्हैसा महामार्गावर दोन मोटसायकलची धडक; अपघातात तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

भोकर-म्हैसा महामार्गावर दोन मोटसायकलची धडक; अपघातात तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

भोकर-म्हैसा महामार्गावर पिंपळगाव शिवारात वेगात असणाऱ्या दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे. पिंपळढव शिवारात कोंडदेव तांडा उतारावर असलेल्या भोकर- म्हैसा रस्त्यावर भीषण अपघात झाला. परशुराम किशन डाकोरे, गंगाधर विश्वनाथ मैसुरे आणि ज्ञानेश्वर मानेबोईनवाड अशी मृतांची नावे आहेत. तर विनायक बोरोड गंभीर जखमी झाले आहेत.

परशुराम किशन डाकोरे कामाठी,गंगाधर विश्वनाथ मैसुरे मदतनीस (रा.शिळवाडी ता.देगलूर) हे दोघे मातूळ शिवारात असलेल्या व्यंकटराव देशमुख पोस्ट बेसिक आश्रम शाळेत काम संपवून भोकरकडे मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी भोकरकडून भरधाव बुलेटने ज्ञानेश्वर मानेबोईनवाड म्हैसाकडे जात होते. या दोन मोटसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर यांच्या गाडीवरील विनायक बोरोड (रा.नांदा,श्रावन पेंडेमोड रा.कुंभरगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर भोकरच्या ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला पाठवण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;