सुभेदार प्रमोदसिंह होन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुभेदार प्रमोदसिंह होन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

माता की जय, वीर जवान तू अमर रहे, वंदे मातरम अशा घोषणा देत मंगळवारी सायंकाळी 6 वाजता कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सुभेदार प्रमोदसिंह रावसाहेब होन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमात चांदेकसारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक आर. पी. होन यांचे ते सुपुत्र होत. ते सैन्य दलात कार्यरत होते. चांदेकसारे पंचक्रोशीतून प्रमोदसिंह होन यांना अखेरचा निरोप देताना हजारोचे डोळे पाणावले.

पुणे इथून सुभेदार होन यांचे पार्थिव सैन्यदलातील जवानांच्या टीमने सायंकाळी पाच वाजता चांदेकसारे येथे आणले. होन यांना शेवटचा निरोप देताना गावातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमीत शासकीय इतमात त्यांना मानवंदना देण्यात आली. कोपरगावचे नायब तहसीलदार व महसूल विभागाची टीम, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. पोलिसांच्या एका तुकडीने व सैन्य दलातील एका तुकडीने तीन रांऊड फायर करत त्यांनी सलामी दिली. सुभेदार होन यांच्या पक्षात आई-वडील, पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;