नवी गोष्ट-नवा सिनेमा; पुष्कर जोग येणार नव्या प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला

नवी गोष्ट-नवा सिनेमा; पुष्कर जोग येणार नव्या प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता पुष्कर जोग… पुष्कर वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर पुष्कर जोग येत असतो. आजवर पुष्करने आपल्या वैविध्यपूर्ण, नैसर्गिक अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. याशिवाय नात्यांतील गुंतागुंतीवरील संवेदनशील विषयांवरील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने केलं आहे. एका पाठोपाठ हे प्रोजेक्ट्स असतानाच आता पुष्करने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘टॅबू’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. आता लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘टॅबू’ सिनेमाचा मुहूर्त

‘टॅबू’ या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेख जोग करणार आहे. योगेश महादेव कोळी या चित्रपटाचे डीओपी आहेत. ‘टॅबू’ची खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणार हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. दरम्यान, या चित्रपटात कोणते चेहरे झळकणार हे जाणून घेण्यासाठी थोडी पाहावी लागेल.

पुष्कर काय म्हणाला?

‘टॅबू’ सिनेमाबाबत पुष्कर जोगने प्रतिक्रिया दिली आहे. एक कलाकार म्हणून माझ्याकडून जे सर्वोत्कृष्ट देता येईल, ते देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. रिऍलिस्टिक चित्रपट हे प्रेक्षकांना जास्त जवळचे वाटतात. त्यामुळे मी नेहमीच नातेसंबंधांवर चित्रपट बनवतो. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. काही नवनवीन देण्याचा माझा कायमच प्रयोग करतो. ‘टॅबू’च्या माध्यमातूनही मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लवकरच चित्रपटही भेटीला येईल, असं पुष्कर जोग म्हणाला.

यंदाचं वर्ष तर पुष्करसाठी जास्तच खास आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने ‘मुसाफिरा’सारखा भव्य चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर या ठिकाणी चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. या ठिकाणी चित्रीकरण करणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. तर ‘कोक’ या आगामी बॉलिवूड चित्रपटात पुष्कर लीड रोलमध्ये झळकणार असून लवकरच त्याचा ‘ ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. यात अभिनयासह दिग्दर्शनाची जबाबदारीही पुष्करने सांभाळली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;