तिशा कुमारच्या शोकसभेत सोनू निगमला अश्रृ अनावर, भावूक करणारा व्हिडिओ

तिशा कुमारच्या शोकसभेत सोनू निगमला अश्रृ अनावर, भावूक करणारा व्हिडिओ

चित्रपट निर्माता आणि अभिनेते कृष्ण कुमार यांंच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांच्या घरातील एका व्यक्तीचं फक्त वयाच्या 20 वर्षी निधन झालंय. कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार ही खूप लवकर हे जग सोडून निघून गेली. तिशाला कॅन्सर होता. ती या आजाराशी झुंज देत होती, मात्र अखेर तिची झुंज अपयशी ठरली. 18 जुलै रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्यावर जर्मनीत उपचार सुरू होते आणि तिथेच तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे संपूर्ण बॉलिवूड विश्वाला देखील धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा देखील कॅन्सरमुळे मृत्यू झालाय.

तिशाच्या निधनानंतर तिला मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर 22 जुलैला तिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि संध्याकाळी शोकसभा ठेवण्यात आली होती. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये तिची आठवण करून कुटुंबासह स्टार्स भावूक झाले आहेत.

सोनू निगमला आपले अश्रू अनावर

कुमार कुटुंबाने 22 जुलै रोजी घरातील एक व्यक्ती कायमचा गमावला. तुलसी कुमारपासून ते भूषण कुमारपर्यंत, दिव्या खोसला यांनीही त्यांच्या चुलत बहिणीबद्दल भावनिक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. आता एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सोनू निगम तिशाच्या शोकसभेत पोहोचला आहे. सोनू निगम कृष्णकुमार यांच्या जवळ बसला. त्यानंतर तो मान खाली घालून रडू लागला. अशा परिस्थितीत कृष्ण कुमार त्याची काळजी घेताना दिसले. सोनू निगमची पत्नीही त्याच्या सोबत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ॲनिमलच्या स्क्रीनिंगमध्ये दिसली होती तिशा

तिशा ही मीडियापासून लांब राहायची. ती शेवटची रणबीर कपूरच्या ॲनिमल चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये दिसली होती. वडील कृष्णासोबत पोज देताना ती दिसली होते. तिने ब्लॅक टॉप आणि जीन्स घातली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;