Nagar News : बिबट्यांचा धुमाकुळ; एका वर्षाच्या कालवडीचा पाडला फडशा, नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण

Nagar News : बिबट्यांचा धुमाकुळ; एका वर्षाच्या कालवडीचा पाडला फडशा, नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण

देवळाली प्रवरा येथील वाळूंज वस्तीवर सोमवारी राञी 11 वाजता दोन बिबट्यांनी एक वर्षाच्या कालवडीचा फडशा पाडला. परिसरात बिबट्यांनी धुमाकुळ घातला असून येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

देवळाली प्रवरा वाकाण वस्ती जवळील वाळुंज वस्ती येथिल संभाजी निवृत्ती वाळुंज यांच्या गोठ्यात सोमवारी राञी 11 वाजता दोन बिबट्यांनी एक वर्षाच्या कालवडीवर हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात गोठ्यातील कालवडीचा बिबट्यांनी फडशा पाडला. त्यावेळी इतर जनावरांनी मोठ मोठ्यांनी ओरडायला सुरुवात केली. त्यामुळे वाळुंज यांनी बाहेर येऊन पाहिले असता तीन ते चार फुट उंचीचे दोन बिबटे कालवडीचे लचके तोडीत असताना दिसले. आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यांनी धुम ठोकली.

वनपरिक्षेत्र अधिकारी यू.जे पाचरणे यांचे आदेशाअन्वये वनपाल आर एस रायकर व बाबासाहेब सिनारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शेतकऱ्यांनी बिबट्या पासून आपल्या पशुधनाची सुरक्षा करण्यासाठी लोखंडी जाळ्या बसवण्याची मागणी केली आहे. शेतात काम करताना शेतकरी व शेतमजुर यांनी गळ्यास मफलर सारखे जाड कापड गुंडाळावे अशा सुचना वनविभागाच्या वतीने करण्यात आल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;