कोतुळ ते संगमनेर ट्रॅक्टर रॅलीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शासकीय कार्यालयासमोर शेण ओतून केला निषेध

कोतुळ ते संगमनेर ट्रॅक्टर रॅलीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शासकीय कार्यालयासमोर शेण ओतून केला निषेध

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे गेले 18 दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसले आहेत. आंदोलनाच्या आठव्या दिवशी मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाब पॅटर्नचे अनुकरण करत शेकडो ट्रॅक्टर एकत्र करून आज जबरदस्त रॅली काढली. कोतुळ ते संगमनेर 55 किलोमीटर अंतर पार करत 300 पेक्षा जास्त ट्रॅक्टर आज संगमनेर शहरात धडकले.

अकोले येथे पोलीस प्रशासनाने ट्रॅक्टर रॅली अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र संगमनेरला जायचेच यावर आंदोलन ठाम राहिले. अखेरीस पोलीस प्रशासनानेही आंदोलनांच्या मागण्यांची तीव्रता लक्षात घेता व आंदोलकांच्या भावना लक्षात घेता रॅलीस सहकार्य केले. संगमनेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टरची लांबच लांब रांग उभी करत आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर दूध ओतून व ट्रॉली भर शेण ओतून आपला संताप व्यक्त केला. दुधाच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या नगर जिल्ह्यात दुग्धविकास मंत्री राहतात. आंदोलनाच्या आठव्या दिवसानंतर सुद्धा त्यांनी आंदोलनाची पुरेशी दखल घेतलेली नाही याबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या. कोतुळ वरून 300 पेक्षा जास्त ट्रॅक्टर 55 किलोमीटरचे अंतर पार करीत संगमनेरला येऊ शकतात तर अशीच ट्रॅक्टर रॅली लोणी पर्यंत ही निघू शकते किंबहुना अकोले, संगमनेर व नगर जिल्ह्यातील सर्व संघटना व आंदोलकांना एकत्र करत ट्रॅक्टर रॅलीचा एल्गार मंत्रालयालाही धडक देऊ शकतो. सरकारने ही वेळ शेतकऱ्यांवर आणू नये अशा प्रकारची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. आजच्या आंदोलनानंतरही कोतुळ येथे सुरू असलेले बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी जिल्हाभरातील सर्व कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले विनोद देशमुख, सदाशिव साबळे अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव,योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार, आदींनी केले. अमित भांगरे, संदीप शेणकर, गुड्डू शेटे, नितीन नाईकवाडी, महेश नवले, शुभम आबंरे, दत्ता ढगे, सागर वाकचौरे, संदीप दराडे, आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

संगमनेर तालुक्याच्या वतीने बाबा ओहोळ यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला. चिखली या ठिकाणी दूध वाटून तर धांदरफळ या ठिकाणी केळी व नाश्ता वाटून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी आंदोलनाप्रती आपली सद्भावना व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;