गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी 6 कोटींची देणगी

गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी 6 कोटींची देणगी

शिर्डी येथे साजरा झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सावात जवळपास दोन लाखांहून अधिक भाविकांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. साईभक्तांनी या तीन दिवसात तब्बल 6 कोटी 25 लाख 98 हजार 344 गुरुदक्षिणा साईचरणी अर्पण केली. श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने शनिवार 20 ते सोमवार 22 जुलै 6 कोटी 25 लाख 98 हजार 344 इतकी देणगी प्राप्‍त झाल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. सदर देणगी मध्‍ये रोख स्‍वरुपात रुपये 02 कोटी 53 लाख 29 हजार 575 दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली असून, देणगी काऊंटर 01 कोटी 19 लाख 79 हजार 190 रुपये, पी.आर.ओ. सशुल्‍क पास 46 लाख 73 हजार 400, डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 01 कोटी 95 लाख 13 हजार 884 रुपये, सोने 122.500 ग्रॅम रक्‍कम रुपये 08 लाख 31 हजार 388 व चांदी 4,004.600 ग्रॅम रक्‍कम रुपये 02 लाख, 70 हजार 907 यांचा समावेश आहे.

श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत साधारणतः 02 लाखाहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्‍सव कालावधीमध्‍ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे 01 लाख 91 हजार 349 साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत 01 लाख 96 हजार 200 साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या कालावधीत 62 लाख 31 हजार 125 रूपये सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त झाले. उत्‍सव काळात हजारो साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, व्‍दारावती निवासस्‍थान, साईआश्रम भक्‍तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरीता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्‍या पालख्‍यांमधील पदयात्री साईभक्‍तांनी निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला. उत्‍सवा दरम्‍यान संस्‍थान परिसरात उभारण्‍यात आलेल्‍या प्रथमोपचार केंद्रात साधारण 5810 साईभक्‍तांनी उपचार घेतले तसेच 205 साईभक्‍तांनी रक्‍तदान केले असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;