Photo – गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सारा दिसतेय बार्बी डॉल, फोटो पाहून चाहते झाले फिदा

Photo – गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सारा दिसतेय बार्बी डॉल, फोटो पाहून चाहते झाले फिदा

सारा अली खानने बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश लूकसाठी कायम चर्चेत असते. ती वेगवेगळ्या हटके स्टाईल करत तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधत असते. आता सारा अली खानने नुकतेच गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत त्यात ती अगदी बार्बी दिसत असून चाहत्यांनी तिच्या या फोटोचे प्रचंड कौतुक केले आहे. सारा अली खान नुकतीच एका इव्हेंटमध्ये शॉर्ट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. सारा या ड्रेसमध्ये अगदी बार्बी डॉलसारखी दिसत होती. साराने गुलाबी रंगाचा ट्युह फ्रॉक घातला होता त्यावर एक मोठा बो होता जो आकर्षक दिसत होता. साराने या आऊटफिटवर हलका मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल केली होती. तिने कानात स्टडिड बो इअरिंग घातले होते. तिने आपल्या या ड्रेसवर गुलाबी रंगाचे ब्लॉक हाय हिल्स घातले होते. सध्या तिच्या या बार्बी लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;