‘बालिका वधू’ फेम आनंदीने उरकलं गुपचूप लग्न? म्हणाली, ‘मुलगा नोकरी करतो पण…’

‘बालिका वधू’ फेम आनंदीने उरकलं गुपचूप लग्न? म्हणाली, ‘मुलगा नोकरी करतो पण…’

‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अविका हिने भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. पॉडकास्टमध्ये हर्ष आणि भारती यांनी अविका हिच्यासोबत अनेक मुद्द्यांवर गप्पा मारल्या… शिवाय अविका हिला लग्नाबद्दल देखील विचारण्यात आलं.

पॉडकास्टमध्ये अविका म्हणाली, ‘मी गेल्या चार वर्षांपासून मिलिंद चंदवानी याला डेट करत आहे. मिलिंद आपल्या इंटस्ट्रीतील नाही. तो 9 ते 5 नोकरी करते. शिवाय त्याचा स्वतःचा एक NGO देखील आहे. जेव्हा आमच्या नात्याची सुरुवात झाली तेव्हा जवळपास 6 महिने आम्ही फ्रेंडझोनमध्ये होतो…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

‘मिलिंदला कायम वाटायचं की, कोणत्याही नात्यात अधिक घाई झालेली चांगली नसते. आम्ही निर्णय घेण्यासाठी एकमेकांना वेळ दिला. त्यामुळे सहा महिन्यांनंतर मिलिंद मला I Love You म्हणाला. मिलिंद स्वभावाने प्रचंड चांगला आहे. मी माझ्या मनात त्याच्यासोबत लग्न केलं आहे. पण मिलिंद मला कायम म्हणत असतो की, आता फक्त 26 वर्षांची आहेस आणि तो 32 वर्षांचा आहे…’

‘माझ्या आणि मिलिंदच्या वयात फार अंतर आहे. त्यामुळे मी माझी वेळ घेतल्यानंतर लग्नाचा विचार करावा… असं त्याचं म्हणणं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मनात मिलिंदसोबत लग्न केलं आहे. एवढंच नाही तर, जेव्हा मिलिंद घरी आला तेव्हा आईने मला विचारलं लग्न कधी करणार आहात… माझ्या अनेक मित्रांना आई भेटली आहे. पण कोणत्याच मित्राला भेटल्यानंतर आईच्या मनात अशी भावना आली नाही, जी मिलिंदसाठी आहे…’

पुढे भारतीने अविका हिला लग्नाबद्दल विचारलं, यावर अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नाला वेळ आहे. पण आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत…’ अविका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

सांगायचं झालं तर, मिलिंद चंदवानी याला डेट करण्यापूर्वी अविका हिच्या नावाची चर्चा तिच्यापेक्षा 18 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रंगू लागली. ‘सुसराल सिमर का’ मालिकेतील अभिनेता मनिष रायसिंगन याच्यासोबत अविका हिच्या नात्याच्या तुफान चर्चा रंगल्या. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा होत्या असं देखील अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;