‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये लीलाचा जीव धोक्यात, एजे वाचवू शकेल का?
'नवरी मिळे हिटलरला' या लोकप्रिय मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत अंतराचा वाढदिवस साजरा होणार आहे. एजेसाठी हा दिवस खूप खास आहे.
लीला एका मिशनमध्ये इतकी गुंतली आहे की 24 तास तिच्या डोक्यात फक्त तोच विषय चालू आहे. हा विषय म्हणजे अंतराचा मृत्यू कसा झाला आणि त्यामागचा सूत्रधार कोण आहे?
सध्यातरी किशोरमुळे शंकेची सुई एजेवरच आहे. लीलाला पुरावे शोधण्यासाठी किशोरकडून सतत फोनवरून दबाव येत आहे. लीला पुरावा शोधण्यासाठी अंतराच्या कपाटाजवळ जाते आणि तेवढ्यात एजे तिला पाहतो आणि तिच्यावर रागावतो.
एजेकडे एक अनमोल लॉकेट आहे, ज्यात त्याचा आणि अंतराचा फोटो आहे. एजे ते फक्त अंतराच्या वाढदिवसाला बाहेर काढतो. श्वेता अंतराच्या फोटोच्या जागी त्या लॉकेटमध्ये लीलाचा फोटो लावते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List