Budget 2024 Nirmala Sitharaman: पूर्वेकडील राज्यांसाठी पूर्वोदय योजनेची घोषणा
देशाच्या पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी अर्थमंत्र्यांनी पूर्वोदय योजना जाहीर केली आहे. केंद्राने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या विकासासाठी पूर्वोदय योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत मानव संसाधन विकास आणि मूलभूत विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे. या योजनेत बिहारसाठी अनेक दणदणीत भेट दिल्या आहेत. अमृतसर-कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत गया येथे एक औद्योगिक केंद्र बांधले जाईल. सांस्कृतिक केंद्रे आधुनिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित केली जातील. या मॉडेलचे नाव ‘विकास भी विरासत भी’ असे असेल.
याशिवाय रस्त्यांची जोडणीही वाढवण्यात येणार आहे. याअंतर्गत पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर भागलपूर द्रुतगती मार्ग, बोधगया-राजगीर वैशाली दरभंगा द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहेत. याशिवाय बक्सरमध्ये गंगा नदीवर दोन पदरी पूलही बांधण्यात येणार आहे. यासाठी 26000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पिरपेंटी येथे 21400 कोटी रुपये खर्चून 2400 मेगावॅट क्षमतेचा पॉवर प्लांट बांधण्यात येणार आहे. बिहारमध्ये नवीन विमानतळ आणि वैद्यकीय महाविद्यालयही बांधले जाणार आहे. भांडवली गुंतवणुकीसाठी बिहारलाही मदत दिली जाईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List