Budget 2024 Live Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरू

Budget 2024 Live Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरू

 

> विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी क्षेत्र आणि हैदराबाद-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील ओरवाकल क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिला जाईल.

> देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाईल.

> इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जातील.

> एक कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप कार्यक्रमाची घोषणा

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘सरकार 500 बड्या कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना सरकार सुरू करणार आहे. यामध्ये 5000 रुपये प्रति महिना इंटर्नशिप भत्ता आणि 6000 रुपये एकरकमी मदत दिली जाईल.

>महिला आणि बालकल्याणासाठी केंद्राकडून 3 लाख कोटींची तरतूद

महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

> शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर सवलत

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ई-व्हाऊचर दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या 3% वार्षिक व्याज सवलतीसाठी थेट दिले जातील.

> केंद्राकडून बिहार-आंध्रसाठी मोठी भेट, भरीव आर्थिक तरतूद

केंद्र सरकारने बिहारमध्ये रस्त्याच्या विकासासाठी 26 हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच बिहारमध्ये नवे विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा केली आहे. यासगळ्यासाठी अतिरिक्त आर्थिक मदत देखील केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आंध्र प्रदेशला राजधानीच्या विकासासाठी अतिरिक्त 15 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.

> रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपये

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ उत्कृष्ट आहे. देशाची चलनवाढ स्थिर राहून 4% च्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रित केले जात आहे. ते म्हणाले की, रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे बजेट आहे.

> सरकारचे 9 प्राधान्यक्रम

1. शेती
2. रोजगार
3. सामाजिक न्याय
4. उत्पादन आणि सेवा
5. शहरी विकास
6. ऊर्जा सुरक्षा
7. नवे उपक्रम
8. संशोधन आणि विकास
9. पुढील पिढीतील सुधारणा

>कठीण काळातही देशाच्या अर्थव्यवस्थेची चमक कायम: निर्मला सीतारामन अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू झाले असून त्या म्हणाल्या की, ‘ देशातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. ऐतिहासिक तिसऱ्यांदा त्यांची पुन्हा निवड झाली आहे’. अर्थमंत्री म्हणाल्या की, कठीण काळातही हिंदुस्थानची अर्थव्यवस्था चमकत आहे’.

 

> यंदाचा अर्थसंकल्प हा गरीब, महिला, युवावर्ग आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवणारा आहे – सीतारामन

> अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरू

> लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी संसदेत पोहोचले

> पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले

> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना

> मुंबई शेअर बाजार निर्देशांक 159 अंकांनी वधारून 80,660 वर पोहोचला

> अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात उत्साह, अर्थसंकल्पाकडून मोठ्या घोषणांची उद्योग क्षेत्राला अपेक्षा

> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात पोहोचल्या

महागाई वाढणार! विकास दर मंदावला, आर्थिक पाहणी अहवालात चिंता

 

Budget 2024,  Live Update, Finance Minister, Nirmala Sitharaman, Union budget of India

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;