राहत फतेह अली खान यांनी अटकेचे वृत्त फेटाळले
दुबईत अटक झाल्याचे वृत्त पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी आज फेटाळून लावले. हे खरे नाही, असे त्यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. मी राहत फतेह अली खान, तुमचा राहत फतेह अली खान आहे. मी दुबईला गाणी रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे… सर्व काही ठीक आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, घृणास्पद अफवांवर लक्ष देऊ नका. हे वृत्त खरे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
माजी व्यवस्थापक सलमान अहमद यांनी केलेल्या बदनामीच्या तक्रारीवरून राहत यांना अटक झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List