जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ; मराठा विद्यार्थ्यांना दिलासा
आरक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता सरकारने सहा महिन्यांची मुदत दिली आहे. आता प्रवेश घेतल्यानंतर सहा महिन्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
उच्च शिक्षण घेणाऱ्या आरक्षणप्राप्त व ईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारू नये, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्वच मुलींना प्रवेश परीक्षा, शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे. मात्र, उच्च शिक्षणात इंजिनियरिंग, मेडिकल आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते.
मुदतवाढ दिल्याने एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे. अर्ज केल्यापासून ही सहा महिन्यांची मुदत लागू असणार आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सध्या सेतू कार्यालये आणि जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयांमध्ये गर्दी झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List