अमित शहा गरीबांचा मुडदा पाडणारे

अमित शहा गरीबांचा मुडदा पाडणारे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फक्त चेहराच माणसाचा आहे. गरीबांचा मुडदा पाडणारे हे लोक आहेत. नरेंद्र मोदी कधी गरिबांविषयी बोलतात का? त्यांना गोरगरीबांविषयी कळवळा नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला. मराठय़ांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही हे तुम्ही एकदा स्पष्ट करा, असेही जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटीत पाचव्यांदा उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या तिसऱया दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. पुण्यात अमित शहांनी केलेल्या भाषणाची जरांगे यांनी चिरफाडच केली. तुम्हाला कधी गरीबांविषयी कणव वाटली? मोदी कधी गोरगरीबांविषयी बोलतात? , असा आसूड जरांगे यांनी ओढला. ओबीसीतून मराठय़ांना आरक्षण देण्यासंदर्भात महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट करावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपची यासंदर्भात काय भूमिका आहे, असा सवाल जरांगे यांनी केला.

ओबीसी जनआक्रोश यात्रेला सुरुवात

मंडल स्तंभ हे ऊर्जा स्थळ आहे. येथूनच ओबीसी भटक्या विमुक्तांना न्याय देण्याचे काम झाले. त्यामुळे येथूनच ओबीसी जनआक्रोश यात्रेला प्रारंभ करण्यात येत असल्याचे प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले. ओबीसी चळवळीने कधी महापुरुषांच्या पुतळय़ाखाली बसून कुणाला शिवीगाळ केली नाही, असा टोलाही त्यांनी जरांगे यांना लगावला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;