मानखुर्दमध्ये मिंधे गटाला भगदाड; महाराष्ट्र नगर, चित्ता कॅम्पमधील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

मानखुर्दमध्ये मिंधे गटाला भगदाड; महाराष्ट्र नगर, चित्ता कॅम्पमधील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिवसेनेत जोरात इनकमिंग सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मानखुर्द वॉर्ड क्रमांक 143 मधील महाराष्ट्र नगर, चित्ता कॅम्पमधील मिंधे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे झालेल्या सोहळ्यात खासदार अनिल देसाई आणि विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी  हाती भगवा झेंडा देत आणि मनगटावर शिवबंधन बांधत कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

शिवसेना भवन येथे झालेल्या सोहळ्यात कार्यालयप्रमुख बळवंत यादव यांच्याबरोबर उपशाखाप्रमुख बाळासो पवार, संगीता खाबाले, सदाशिव वांजोले, कय्युम शेख, मुज्यामिर कुरेशी, सुनील पाटील, शाहूवाडी तालुका विकास युवा मंचचे अध्यक्ष अनिल पाटील, प्रशांत साळुंखे, प्रकाश येळवटकर यांनी प्रवेश केला. यावेळी जत विधानसभा संपर्कप्रमुख तानाजी गुरव, शाखा संघटक सुवर्णा सावंत, अशोक कावळे, उपशाखाप्रमुख लक्ष्मण गुडील, चंद्रकांत शिंदे, हृदयनाथ तारी, चंद्रकांत कमाने, राम भेंडसे, राम भादवणकर, धनराज कदम, अमित करगुटकर, संजय जाधव, मनीष शिवरल आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;