दिवस आहेत शंभर…कसा आता कंबर ! बिग बाॅस मराठीचे काऊंटडाऊन सुरू

दिवस आहेत शंभर…कसा आता कंबर ! बिग बाॅस मराठीचे काऊंटडाऊन सुरू

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण आता आलाच…बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचे काऊंटडाऊन सुरू झाले असून येत्या 28 जूलैपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शंभर दिवस, शंभरहून अधिक कॅमेरे स्पर्धकांवर 24 तास नजर ठेवणार आहेत. या प्रवासात टिकून राहण्यासाठी सेलिब्रेटींना कंबर कसावी लागणार आहे. महाराष्ट्राचा लय भारी अभिनेता रितेश देशमुख आपल्या अनोख्या शैलीने खेळात रंग भरणार आहे.

बिग बॉस मराठीच्या 4 यशस्वी पर्वानंतर प्रेक्षक पाचव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. पाचव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. रितेश देशमुखने यावेळी जबरदस्त अंदाजात एण्ट्री घेतली आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘बिग बॉस मराठी सीझन पाच’ या पर्वाची कलर्स मराठी वाहिनीकडून आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या पर्वात महेश मांजरेकर यांच्याऐवजी लय भारी अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. यावेळी रितेश म्हणाला की,” बिग बॉस या शोचा मी प्रचंड मोठा चाहता आहे. या शोबाबात प्रचंड उत्साही असून हा माझा आवडता शो आहे, हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आहे, भावनिक आहे आणि कुठेतरी प्रेक्षक म्हणून तुम्ही त्या शोशी जोडले जाता. त्यामुळे शो साठी फार एक्सायटेड असणार आहे. रितेश म्हणाला, मला जेव्हा या शोची तारीख सांगण्यात आली त्यावेळी माझे दोन तीन शूट होते. पण मी या शोसाठी ते नक्कीच अॅडजस्ट करेन म्हणालो आणि त्याच्या तारखा पुढे ढकलल्या. हा शो स्विकारण्याबाबत तो म्हणाला की, जो एका शोचा फॅन असतो आणि त्याला जेव्हा ती संधी मिळते तेव्हा तो हो बोलणारच. मराठी बिग बॉस होस्टींग मला वाटत संधीपेक्षा तो मला मिळालेला सन्मान आहे.त्याचा मी आदर करतो. यावेळी रितेश म्हणाला मी हिंदी आणि मराठीचे भरपूर सिझन पाहिले आहेत. आतापर्यंतच्या सीझनमध्ये मला शिव ठाकरे भावला. त्याचे मराठी आणि हिंदी दोन्ही सीझन मी एन्जॉय केले.

बिग बॉस मराठी रिअॅलिटी शो च्या पाचव्या पर्वाची नेमकी थीम काय असणार आहे, कोणते स्पर्धक असणार आहेत हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहेत. यावेळी शोचा नवा होस्ट रितेश देशमुख, चॅनेलचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे उपस्थित होते.

जेनेलिया माझी बिग बॉस

यावेळी रितेशला त्याच्या खऱ्या आयुष्यातील बिग बॉस कोण असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, त्याची बायको जेनेलिया ही त्याच्या आयुष्यातील खरी बिग बॉस असल्याचे यावेळी सांगितले.

सलमान खानसारखे सूत्रसंचालन कोणी करू शकत नाही

सलमान खान ज्याप्रकारे सूत्रसंचालन करतात त्यांच्यासारखं कोणी हा शो होस्ट करू शकेल असे मला वाटत नाही. त्यांची एक इनबिल्ड स्टाईल आहे, अॅटिट्यूड आहे, स्वॅग आहे तो फक्त त्यांचाच आहे. त्यांना पाहून तर बरेच कळते की कसे इंटरॅक्ट व्हायला हवे, कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत, शिवाय कंटेस्टंट जसे स्टॅण्ड घेतात तसे होस्टला स्टॅण्ड घेणे गरजेचे असते. नक्कीच तो स्टॅण्ड घेण्याचा मी प्रयत्न करेन.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;