Pandharpur Wari – नगपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची अहोरात्र मेहनत, शेकडो हातांनी मिळून पंढरपूर केले चकाचक

Pandharpur Wari – नगपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची अहोरात्र मेहनत, शेकडो हातांनी मिळून पंढरपूर केले चकाचक

आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने 15 लाखांहून अधिक वारकरी तसेच भाविकांनी पंढपूरमध्ये हजेरी लावली होती. त्यातच पावसाची सुद्धा रिपरिप सुरू होती. भाविकांनी उघड्यावर खरकटे अन्न व इतर घाण केल्याने पंढरपूरातील बऱ्याच भागांमध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करत शहर आणि उपनगर चकाचक केले आहे.

महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या सोहळ्यासाठी आलेल्या 15 लाखांहून अधिक वारकरी आणि भाविकांना मुलभूत सेवा सुविधा पुरवण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश होते. तसेच पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी यासाठी विशेष यंत्रणा राबवली. गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासूनच 24 तास स्वच्छता मोहिम व कचरा गोळा करण्याचे काम चालू करण्यात आले. नदीपात्र वाळवंट, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपूर  मंदिर परिसर, शहर उपनगर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1500 स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत. भाविकांनी उघड्यावर खरकटे अन्न फेकल्यामुळे व इतर घाण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्यातच पाऊस पडत असल्यामुळे पावसाचे पाणी साठून डासांचे प्रमाण वाढले. त्यामुळे स्वच्छता करताना जंतुनाशक फवारणी सुद्धा करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मलेरिया विभागाकडून 50 कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत 45 घंटागाडी, आरोग्या विभागाकडील 6 टीपर, 3 कॉम्पॅक्टर, 6 डंपिंग ट्रॉली व जेसीबीच्या सहाय्याने 1500 कर्मचाऱ्यांनी पंढपूर चकाचक करण्यात खारीचा वाटा उचलला. तसेच स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. तसेच आपल्या फ्रीजची आणि टेरेसची तपासणी करून डेंग्यू डासाची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;