‘या’ गोष्टीसाठी रितेश देशमुख आहे प्रचंड उत्सुक, म्हणाला, काय होईल माहिती नाही पण मी…

‘या’ गोष्टीसाठी रितेश देशमुख आहे प्रचंड उत्सुक, म्हणाला, काय होईल माहिती नाही पण मी…

बिग बॉस मराठी 5 ची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता बघायला मिळतंय. आता अवघ्या काही दिवसांमध्ये बिग बॉस 5 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या सीजनमध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट करण्यात आले की, सतत चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने आणि विदेशात जावे लागत असल्याने यावेळी आपण बिग बॉसला होस्ट करू शकणार नाहीत. यानंतर चाहत्यांमध्ये नाराजी बघायला मिळाली. मुळात म्हणजे मराठी बिग बॉस सुरू झाल्यापासून महेश मांजरेकर होस्ट करत होते. महेश मांजरेकर यांची  शैली चाहत्यांना प्रचंड आवडते. यावेळी काही वेगळेपणाही बिग बॉस मराठी 5 मध्ये बघायला मिळेल. यंदा बिग बॉस मराठी रितेश देशमुख होस्ट करणार आहे.  आता याबद्दल बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मनात प्रचंड उत्सुकता आहे बिग बॉस 5 ला होस्ट करतोय. नवीन नवीन गोष्टी घडतील तसे तसे पाहावे लागेल काय काय होईल. पुढे भविष्यामध्ये आता निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे राजकारणाचा कदाचित विचार झाला नसावा. राजकारणात कॅरेक्टर नसतात, नेते असतात. कॅरेक्टर चित्रपटात असतात. नेत्यांबद्दल अद्याप विचार केला नाहीये, असे रितेश देशमुख याने म्हटले आहे. ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्यावर बोलणे योग्य नाही पण मी प्रचंड उत्साही आहे ,असं ही रितेश देशमुख म्हणाला आहे.

थोडक्यात काय तर रितेश देशमुख हा बिग बॉस 5 ला होस्ट करण्यासाठी चांगलाच उत्सुक दिसतोय. रितेश देशमुख याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे रितेश देशमुखची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग ही बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही रितेश देशमुख दिसतो.

28 जुलै 2024 पासून तुम्हाला बिग बॉस मराठी 5 बघायला मिळेल. दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर तुम्ही बिग बॉस पाहू शकता. यासोबतच Jiocinema वरही पाहू शकता. रितेश देशमुख याला बिग बॉस मराठी 5 मध्ये आपली छाप सोडता येते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. रितेश देशमुख याचे चाहतेही चांगलेच उत्साही आहेत. बिग बॉस मराठीची प्रेक्षकांमध्ये क्रेझही बघायला मिळतंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;