Nagar News – शिर्डीत भक्तिमय वातावरणात दहिहंडी फुटली; गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Nagar News – शिर्डीत भक्तिमय वातावरणात दहिहंडी फुटली;  गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक 20 जुलै 2024 पासून सुरू झालेल्या गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज (22 जुलै) ह.भ.प. श्रीमती वेदश्री वैभव ओक, डोंबिवली यांच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडून करण्यात आली.
उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्‍या सुविद्य पत्‍नी वंदना गाडीलकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. सकाळी सात वाजता गुरूस्‍थान मंदिरात संस्‍थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व मालती यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक करण्‍यात आला. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्‍या काल्याच्‍या किर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्‍य राजेंद्र सुभाष कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्‍यानंतर 12 वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. दुपारी 1 ते 3 या वेळेत श्रीमती वनिता बजाज, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम झाला. दुपारी चार ते सहा या वेळेत विरेंद्रकुमार, साई ब्रदर्स, प्रयागराज यांचा मनोहारी भक्‍तीमय भजनांचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी सात वाजता श्रींची धुपारती झाली. रात्रौ साडेसात ते साडेनऊ यावेळेत श्री. ग्‍यानेश वर्मा, मुंबई यांचा साईराम गुणगान कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री दहा वाजता श्रींची शेजारती होईल.
उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, विश्‍वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;