पंढरपुरात महाद्वार काला उत्साहात साजरा; आषाढी यात्रेची सांगता

पंढरपुरात महाद्वार काला उत्साहात साजरा; आषाढी यात्रेची सांगता

पंढरपुरात गुलाल, बुक्क्याची उधळण दहीहंडी फोडून महाद्वार काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या येतात. तर विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. गोपाळपूरच्या काल्या दिवशी या सर्व पालख्या व भाविक पंढरीचा निरोप घेतात. मात्र याच्या दुसऱ्या दिवशी पंढरपुरातील स्थानिकांचा उत्सव म्हणून महाद्वार काल्याकडे बघितले जाते.

संत नामदेव महाराजांचे वंशज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. या खडावा हरिदास घराण्यात मस्तकावर धारण करून महाद्वार काला साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज नामदास महाराज यांना दिंडीचा मान असतो.

परंपरेप्रमाणे सोमवारी सकाळी 11 वाजता हरी महाराज नामदास हे दिंडी घेऊन काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर हरिदास घराण्यातील मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या खडावा पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडण्यात आली. मंदिरातून महाद्वार घाटाने चंद्रभागेच्या वाळवंटात तेथून कुंभार घाटावरून माहेश्वरी धर्मशाळा, मुक्ताबाई मठ मार्गे पुन्हा हा सोहळा काल्याच्या वाड्यात दाखल झाला. यावेळी ठिकठिकाणी गुलाल बुक्क्याची उधळण, पुष्पवृष्टी करून दहीहंडी फोडण्यात येत होती. यावेळी हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. महाद्वार आल्यानंतर आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;