आमच्या शेपटावर पाय दिला तर…! राधाकृष्ण विखे यांना नीलेश लंके यांचे आव्हान

आमच्या शेपटावर पाय दिला तर…! राधाकृष्ण विखे यांना नीलेश लंके यांचे आव्हान

आता मी थेट राहत्यामध्येच जाऊन बसणार आहे, असे सांगत खासदार नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना वाडेगव्हाण येथून थेट आव्हान दिले. वाडेगव्हाणच्या मेळाव्यात बोलताना लंके म्हणाले, मी पवार साहेबांना सांगितलंय की राहत्याचा निर्णय लवकर घ्या आणि माझ्यावर जबाबदारी देऊन टाका. मी करतो काय करायचे ते. तुम्हाला साखरेत मळले, घोळले तरी तुमचे वाकडं ते वाकडंच. आमच्या शेपटावर पाय दिला तर मलाही नीलेश लंके म्हणतात अशा शब्दांत लंके यांनी राधकृष्ण विखे यांना आव्हान देत विधानसभेचे रणशिंग फुंकले.

वाडेगव्हाण गटाच्या वतीने आयोजित नागरी सत्कारास उत्तर देताना नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. निवडणूक आयोगाकडे अर्ज करून मशिनची फेरतपासणी करण्यासाठी 18 लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. तज्ञांच्या मते मतदान मशिनमध्ये काहीही फेरफार होणार नाही. असे झाले तर संपूर्ण देशातील निवडणूकीवर संशय घेतला जाईल. याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. अहो, इथे नीलेश लंके आहे. म्हणूनच तुमची जिरवली. माझ्याकडे कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही, बुध्दी आहे म्हणून तर जिरवली ना ? खरे तर आपण हरकत घ्यायला हवी होती. चोराच्या उलटया बोंबा यालाच म्हणतात. लोकांनी जिरवली तर आता आमच्या चुका झाल्या, आम्ही कमी पडलो, आता आपण सुधरून वागले पाहिजे. पण एखाद्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असा हल्ला लंके यांनी विखे पिता पुत्रांवर चढवला.

मी दोनदा आलो, त्यांच्या पन्नास चकरा झाल्या!
अनेक जण सांगतात लोकसभेची निवडणूक जिंकणे अशक्य गोष्ट होती. मात्र आपण अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. हे शक्य मी नव्हे तर तुम्ही करून दाखविले आहे. मी एक माध्यम आहे. मी सगळया ठिकाणी पोहचू शकत नाही. संपूर्ण लोकसभा निवडणूकीत मी फक्त दोन दिवस तालुक्यात आलो. त्या तुलनेत विरोधी उमेदवाराच्या व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या पन्नासच्यावर चकरा झाल्याचे लंके म्हणाले.

दिल्लीत सर्व जुळवून आलोय!
खासदार होऊन दिल्लीत गेल्यानंतर सुरळीत हाईल की नाही शंका होती. चार दोन दिवस थांबलो आणि सर्व काही जुळवून आलो आहे. मुंबईप्रमाणेच दिल्लीचेही कामकाज असल्याने काही अडचण येणार नसल्याचे लंके म्हणाले.

बारानंतर स्टेट्स बदलणारे लक्षात आले!
महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होईपर्यंत आपल्या सोबत असलेले विरोधकांच्या कळपात गेले. मी खासदार झाल्यानंतर पुन्हा आमच्याकडे येऊ पाहत आहे. खरं तर मी परमेश्‍वराला धन्यवाद देतो की मतमोजणीच्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत आपण मागे होतो, ते चांगले झाले. बारा वाजेपर्यंत विरोधकांचे स्टेटस ठेवलेले आपण मतमोजणीत पुढे गेल्यानंतर आपले स्टेटस ठेवणारे लक्षात आले. आपल्या कार्यालयात अशा लोकांच्या स्टेटसचे स्क्रिन शॉटही पहावयास मिळतील, असेही लंके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;