अभिषेक बच्चन लेक आराध्याला म्हणाला, ‘बच्चन कुटुंबाचं नाव धुळीस मिळेल…’

अभिषेक बच्चन लेक आराध्याला म्हणाला, ‘बच्चन कुटुंबाचं नाव धुळीस मिळेल…’

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ऐश्वर्या – अभिषेक यांनी रंगणाऱ्या चर्चेवर अद्याप अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. बच्चन कुटुंबाची प्रतिष्ठा इंडस्ट्रीमध्ये फार मोठी असल्यामुळे घटस्फोटाची घोषणा करत नसल्याची देखली चर्चा रंगत आहे. दरम्यान, बच्चच आडनाव असल्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली मानतो.. असं वक्तव्य खुद्द अभिषेक बच्चन याने केलं होतं.

अभिषेक बच्चन म्हणाला होता, ‘माझं आडनाव माझ्यासाठी पवित्र आहे. माझं आडनाव मला माझ्या आजोबांनी दिलं आहे आणि माझ्या वडिलांनी नावाची प्रतिष्ठा वाढवली आहे. मी आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आडनावामुळे… माझं आडनाव सोडून दुसरी ओळख निर्माण करावी असं मला कधीच वाटलं नाही…’

 

‘माझी पत्नी ऐश्वर्या आता मुलगी आराध्या हिला नावाचं महत्त्व शिकवत आहे. बच्चन आडनावाचं महत्त्व किती मोठं आहे… हे आराध्याची आई तिला शिकवत असते. आम्ही आराध्यावर कोणत्याच प्रकारचा दबाव टाकत नाही. पण तिच्या वडिलांनी, आजोबांनी जे काही आतापर्यंत केलं आहे, त्याचा सन्मान आराध्याने करावा.. एवढंच आम्ही तिला शिकवत आहोत…’

 

 

‘आराध्याने असं काहीही करु नये ज्यामुळे बच्चन कुटुंबाचं नाव धुळीस मिळेल…’, सांगायचं झालं तर, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन कायम लेक आराध्या हिच्याबद्दल सांगत असतात. सोशल मीडियावर देखील बच्चन कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

ऐश्वर्या – अभिषेक 

अनेक वर्ष डेट केल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. 2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या बच्चन हिला जन्म दिला.  आराध्या आता 13 वर्षांची आहे. आराध्या एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्टारकिड असल्यामुळे कायम तिच्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर आराध्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;