फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? शाहरुखसोबत 1100 कोटींचा सिनेमा, 27 व्या वर्षी धर्मपरिवर्तन

फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? शाहरुखसोबत 1100 कोटींचा सिनेमा, 27 व्या वर्षी धर्मपरिवर्तन

या फोटोमध्ये वडिलांसोबत दिसणारी गोड मुलगी आता मोठी झाली असून सिनेसृष्टीत चांगलं नाव कमावत आहे. या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून आघाडीचं स्थान पटकावलं आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या साऊथच्या अभिनेत्रींमध्ये तिचा आवर्जून समावेश होतो. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील यशानंतर नुकतंच या अभिनेत्रीने शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. या चित्रपटाला तब्बल 1100 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवण्यात यश मिळालं. जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल तर आम्ही तुमची मदत करतो. तिचा चेहरा बघून तुम्ही अंदाज लावू शकता की फोटोतील निरागस चेहऱ्याची ही मुलगी आजच्या काळातील यशस्वी अभिनेत्री बनली आहे.

ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आहे. नयनताराची गणना साऊथच्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. बॉलिवूडमध्येही तिची डिमांड वाढली आहे. शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटातून तिने कमाल केली होती. नयनताराचं खरं नाव डायना मरियम कुरियन असं आहे. तिने अभिनयक्षेत्रातील प्रवासाची सुरुवात 2003 मध्ये ‘मनासीनाकाडे’ या मल्याळम चित्रपटातून केली. मल्याळम भाषेत काही चित्रपटं केल्यानंतर तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. ‘अय्या’ हा तिचा पहिला तमिळ चित्रपट आहे. त्यानंतर तिने कन्नड भाषेतील चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. 2011 मध्ये ‘श्री राम राज्यम’ या तेलुगू चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

2011 पूर्वी नयनतारा ख्रिश्चन होती. 2011 मध्ये तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. तिचं नाव एकेकाळी प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभू देवाशी जोडलं गेलं होतं. प्रभूदेवाशी लग्न करण्यासाठीच तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचं म्हटलं जातं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नयनताराने 2022 मध्ये निर्माता विग्नेश शिवनशी लग्न केलं. त्यानंतर हे दोघं सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा बनले. त्यांना जुळी मुलं आहेत. नयनतारा ही सध्याच्या घडीची साऊथमधील अत्यंत महागडी अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी ती 20 ते 25 कोटी रुपये मानधन स्वीकारते. ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी’च्या यादीत नयनतारा ही दक्षिणेतील एकमेव महिला अभिनेत्री आहे, जिची संपत्ती तब्बल 200 कोटींच्या घरात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;