ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच अभिषेक बच्चन याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले, ऐश्वर्या…

ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच अभिषेक बच्चन याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले, ऐश्वर्या…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव  आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या कामामुळे नाहीतर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यात वादळ आल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन विभक्त राहत आहेत आणि लवकरच यांचा घटस्फोट होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले.

सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच दुसरीकडे घटस्फोटाची एक पोस्ट अभिषेक बच्चन याने लाईक केल्याने चर्चांना उधाण आले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबासोबत दाखल झाली नव्हती. ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत लग्नात आली, ज्याचे अनेक फोटोही व्हायरल होताना दिसले.

आता अभिषेक बच्चन याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. अभिषेक बच्चन हा फुटबॉलर्सला भेटण्यासाठी मैदानात पोहोचल्याचे बघायला मिळतंय.  फुटबॉलर्सची गळाभेट घेत आहे. त्यांच्याशी गप्पा मारतानाही अभिषेक बच्चन हा दिसत आहे. अभिषेक बच्चन याच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

एकाने अभिषेकच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ऐश्वर्या राय कुठे आहे? दुसऱ्याने लिहिले की, अभिषेक तुझी आणि ऐश्वर्याची जोडी खूप जास्त छान आहे, अशी तोडू नका. तिसऱ्याने लिहिले की, तुमच्या दोघांमधील जे काही वाद आहेत, ते तुम्ही दोघांनी एकत्र येत दूर करा. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही घटस्फोटाबद्दल भाष्य केले नाहीये.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या फंक्शननंतर त्याच रात्री ऐश्वर्या राय ही लेक आराध्या हिच्यासोबत विदेशात गेली. आराध्या आणि ऐश्वर्या राय यांचे विमानतळावरील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अभिषेक बच्चन त्यांच्यासोबत विदेशात गेला नसल्यानेही लोकांनी अभिषेकला कुठे सोडल्याचे थेट कमेंट करत विचारले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;